Skip to Navigation Skip to Main Content Contact us
Skip to Navigation Skip to Main Content Contact us
 • ‘पीपीएफएएस लाँग टर्म व्हॅल्यू फंडा’कडून तीन वर्षांत १९.६६ टक्केदराने परतावा

  Loksatta, June 1, 2016

     read ( words)

  देशातील पहिल्या नोंदणीकृत पोर्टफोलियो मॅनेजमेंट देशातील पहिल्या नोंदणीकृत पोर्टफोलियो मॅनेजमेंट (पीएमएस) सेवा पुरवठादारांपैकी एक असलेल्या पराग पारीख फायनान्शियल अ‍ॅडव्हायजरी सव्‍‌र्हिसेस (पीपीएफएएस) एएमसीने प्रस्तुत केलेली तिची प्रमुख योजना ‘पीपीएफएएस लाँग टर्म व्हॅल्यू फंडा’ने सातत्त्यपूर्ण कामगिरीची तीन वर्षे पूर्ण करून, गुंतवणूकदारांना वार्षिक १९.६६ टक्के दराने परतावा देणारी कामगिरी केली आहे. मे २०१३ मध्ये प्रारंभिक खुल्या विक्री (एनएफओ)द्वारे केवळ ७६८ गुंतवणूकदारांकडून उभ्या राहिलेल्या ६३.८७ कोटी रुपये मालमत्तेसह या फंडाने मुदतमुक्त (ओपन एंडेड) योजना म्हणून सुरुवात केली. २९ एप्रिल २०१६ रोजी फंडांच्या गुंतवणूक गंगाजळीत दसपटींनी वाढ होऊन ती ६६३.८९ कोटी रुपयांवर गेली आहे.

  डायव्हर्सिफाइड फंड असूनही, वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रांतील वृद्धिक्षम छोटय़ा – मोठय़ा कंपन्यांची निवड करून त्यांच्या समभागात गुंतवणूक आणि प्रसंगी उपलब्ध आर्ब्रिटाज संधी हेरून या फंडांने ‘निफ्टी ५००’ या आधार निर्देशांकापेक्षा खूप सरस कामगिरी केली आहे, असे पीपीएफएएस म्युच्युअल फंडाचे मुख्याधिकारी आणि अध्यक्ष नील पारिख यांनी सांगितले.

  आकर्षक मूल्यावर उत्तम कंपन्यांचे समभाग खरेदी करण्याची गुंतवणूक पद्धत आजवर लाभदायी ठरली असल्याचे मत या फंडाचे निधी व्यवस्थापक राजीव ठक्कर यांनी सांगितले. उल्लेखनीय म्हणजे गुंतवणुकीसाठी कंपनी निवडताना भौगोलिक क्षेत्राचे बंधन न पाळता, विदेशातील कंपन्याही गुंतवणुकीत सामावण्यात आल्या. अधिकाधिक भौगोलिक प्रदेशांत गुंतवणूक विस्तारून जोखीम संतुलन साधले गेल्याचे त्यांनी सांगितले.

  The original article could be seen here.

  comments powered by Disqus

  Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.
  © 2019 PPFAS Asset Management Private Limited. All rights reserved.
  Sponsor: Parag Parikh Financial Advisory Services Private Limited. [CIN: U67190MH1992PTC068970], Trustee: PPFAS Trustee Company Private Limited. [CIN: U65100MH2011PTC221203], Investment Manager (AMC): PPFAS Asset Management Private Limited. [CIN: U65100MH2011PTC220623]