Skip to Navigation Skip to Main Content Contact us

पीपीएफएएस म्युच्युअल फंडच्या लाँग टर्म व्हॅल्यू फंडची तीन वर्षे पूर्ण

Punya Nagari, June 6, 2016

   read ( words)

मुंबई : पीपीएफएएस म्युच्युअल फंडची फ्लॅगशिप योजना-पीपीएफएएस लाँग टर्म व्हॅल्यू फंड (पीएलटीव्हीएफ)ने सातत्यपूर्ण कामगिरीची तीन यशस्वी वर्षे पूर्ण केली आहेत. हा फंड २0१३ मध्ये ओपन-एण्डेड स्कीम म्हणून दाखल करण्यात आला होता. या फंडच्या एनएफओमध्ये ७६८ गुंतवणूकदारांकडून ६३.८७ कोटी रुपये प्राप्त झाले होते. या फंडचे एयूएम ६६३.८९ कोटी रुपये इतके आहेत, ज्यातील १२.८५ टक्के प्रोमोटर ग्रुप आणि फंड हाऊसच्या व्यवस्थापनाने व कर्मचार्‍यांनी गुंतवलेले आहेत.पीपीएफएएस लाँग टर्म व्हॅल्यू फंड ही डायव्हर्सिफाईड इक्विटी स्कीम आहे. या योजनेंतर्गत भारत तसेच परदेशातील अनेक क्षेत्रांमधील छोट्या व मोठय़ा कंपन्यांच्या भागांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते. याशिवाय, संधी मिळतील तशा स्पेशल सिच्युएशन्स किंवा आर्बिट्रेज अपॉच्र्युनिटींमध्ये सहभागी होता येते. या योजनेने एक सर्वसमावेशक इक्विटी स्कीम म्हणून ओळख मिळवलेली आहे.

The original article could be seen here.